महाळुंगे येथून सिलेंडरसह पिकअप गाडी चोरट्यांनी पळवली २ लाख ९५ हजाराचा ऐवज लंपास
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
म्हाळुंगे : महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) गावच्या हद्दीतून १९ सिलिंडर असलेली पिकअप गाडी अज्ञात चोरटयांनी पळवून नेली आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि. ११ ) रात्री २ ते सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान महाळुंगे येथील देवा इंटरप्रायजेस समोरून ऑक्सिजनने भरलेले १२ व मोकळे ७ असे एकूण १९ सिलिंडर असलेली पिकअप गाडी ( क्रमांक एम एच ४३ एडी ०३९८ ) असा एकूण २ लाख ९५ हजाराचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. याबाबत बाबुराव बिसाजी चौधरी ( वय ५२, रा. द्वारका सिटी, महाळुंगे, बिल्डिंग नं. ३, रूम नं. २, ता.खेड, जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.