महाबुलेटीन न्यूज अपडेट : 27 डिसेंबर 2020
महाबुलेटीन न्यूज अपडेट : 27 डिसेंबर 2020
● 26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार
● प्रजासत्ताक दिन आणि आर्मी डे परेडसाठी दिल्लीत आलेले 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह; जवानांना दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये दाखल करण्यात आले
● विद्युतीकरणामुळे रेल्वेची वार्षिक 14,500 कोटींची इंधन बचत, नोव्हेंबरपर्यंत 66 टक्के रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
● कोरोना विषाणूचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य नाही; दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री वेलींनी माखीजे यांचे वक्तव्य
● कोकण रेल्वे मार्गावर पुणे-एर्नाकुलम विशेष गाडी आजपासून धावणार; कणकवली, सावंतवाडीला थांबा
● कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस 15 मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार
● पश्चिम रेल्वेचा मराठी भाषेला दुजाभाव, मराठी भाषा विभागाने पत्र लिहून खडसावले
● सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई संघ जाहीर, अर्जुन तेंडुलकरला डच्चू तर ‘सूर्यकुमार यादव’ कडे कर्णधारपद सोपविले
● फ्लिपकार्टवर आजपासून सेलला सुरुवात, iPhone 11 Pro ते Moto G 5G स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार सूट
● सोनी लिवची ओरिजिनल सिरीज ‘सँडविच फॉरेव्हर’मध्ये अभिनेते अतुल कुलकर्णीची हटके भूमिका दिसणार