लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालूक्यात वीज पडुन दोन युवकांचा मृत्यु
महाबुलेटीन नेटवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : लातुर जिल्ह्यातील शेंद दक्षिण ता. शिरूरअनंतपाळ येथील शेतीत काम करित असताना सालगडी गौतम कांबळे ( वय ३४ ) व शेत मालकाचा मूलगा अभिजीत मोरे ( वय १९ ) यांच्या अंगावर वीज पडुन जागीच मृत्यु झाला. ही घटना गुरुवारी ( दि. २५ ) सांयकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
शिरूर अनंतपाळ तालूक्यातील शेंद दक्षिण येथे गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले, त्यांनतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात काम करणारा सालगडी गौतम कांबळे व शेत मालकाचा मुलगा अभिजीत मोरे हे आंब्याच्या झाडाखाली थांबले असता विजेचा कडकडाट होऊन वीज झाडावर कोसळली. त्यातच दोघांचाही जाग्यावर मृत्यु झाला. गौतम याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मूली असुन पत्नी आठ महिण्याची गरोदर आहे. तर अभिजीत हा पुणे येथे फोर व्हिलर गाडीचा मेकॅनिक म्हणुन काम शिकत होता. तो लाॅकडाऊन असल्याने तीन महिन्यांपासून गावी आला होता. आईवडीलांना शेतीकामात मदत करण्यासाठी तो शेतात गेला होता. त्यांच्या मृत्यु मूळे शेंद येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
तलाठी सदानंद सोमवंशी व मंडळ अधिकारी डोंगरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असल्याची माहीती तहसिलदार अतुल जटाळे यांनी दिली.

गौतम कांबळे अभिजीत मोरे