Friday, August 29, 2025
Latest:
खेडनिवडणूकपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : खेड तालुक्यातील ‘या’ गावात उमेदवारांना पडली समान मते, अन चिठ्ठीने दिला कौल..

 

महाबुलेटीन न्यूज
पाईट : खेड तालुक्यातील आंबोली गावात ग्रामपंचायत निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी द्वारे उमेदवारांचे नशीब अजमविण्यात आले. यात दत्तात्रय सुतार यांच्या बाजूने चिठ्ठीने कौल दिला.

आंबोली येथील गावात वॉर्ड क्रमांक १ मध्ये नितीन बाळू खंडागळे व दत्तात्रय अनंता सुतार हे दोन उमेदवार नागरिकांचा मागास प्रवर्गामधून उभे होते. खंडागळे यांना टपाली ५ व मशिनद्वारे १८० मते मिळाली, तर सुतार यांना टपालातून शून्य व मशिनद्वारे १८५ मते मिळाल्याने दोघांची मते समान झाली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक अधिकारी प्रवीण शिंदे, गणेश डावखर व गोविंद जाधव यांनी चिठ्ठीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करून दत्तात्रय सुतार यांना विजयी घोषित केले. पाईटच्या पत्रकार वनिता कोरे यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.

निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-
———
वॉर्ड क्रमांक १:-
दत्तात्रय अनंता सुतार – १८५ मते
शिल्पा संजय कोकणे – १९७ मते
——-
वॉर्ड क्रमांक २:-
नकुशा उल्हास शिंदे – ३५० मते
विष्णू दत्तात्रय काळडोके – ३४१ मते
शरद सखाराम शिंदे – ३७२ मते
——-
वॉर्ड क्रमांक ३:-
तृप्ती संजय शिंदे – बिनविरोध
संगीता मारुती मोहन – बिनविरोध
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!