खेड तालुक्यातील आरोग्य तपासणी सर्वेक्षणाच्या तारखा बदलल्या. १८ व १९ ला होणार तपासणी, दोन दिवस जनता कर्फ्यु
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : बैलपोळा सण आल्यामुळे राजगुरूनगर, चाकण व आळंदी या तीन शहरातील जनता कर्फ्यु व नागरिकांची तपासणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली यांनी दिली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत शुक्रवार दि. १८ व शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ही आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या अगोदर जाहीर केलेल्या १५ व १६ या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत.
राजगुरुनगर, आळंदी, चाकण ह्या तीनही शहरातील व्यापार अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळून दि.१८ आणि दि. १९ रोजी पुर्णपणे बंद रहाणार आहे. त्या दिवशी नागरिकांची फक्त आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घरीच थांबून घरी येणाऱ्या आरोग्य सेवकास खरी माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.
#खेड_तालुक्यात_18_व_19_तारखेला_जनता_कर्फ्यू
Maha Bulletin News यांनी वर पोस्ट केले सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०