खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्न, भामा आसखेड व चासकमान पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भातील प्रश्नांवर लवकरच बैठक लावण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्न, भामा आसखेड व चासकमान पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भातील प्रश्नांवर लवकरच बैठक लावण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील प्रदीर्घ प्रलंबित सेझ १५ टक्के परतावा प्रश्न, आणि काळुस आणि चाकण पट्ट्यातील शेत जमिनीवरटाकलेले भामा आसखेड व चासकमान पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भातील प्रश्न यासंदर्भात नुकताच काळुस, ता. खेड जि. पुणे येथेमाजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यशेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठीमोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व त्यानंतर शासनाकडे या संदर्भात पत्र व्यवहार करून पाठपुरावाकरून बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मेळाव्यानंतर सोमवार दिनांक ३१/१०/२०२२ रोजी सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांतीसंघटनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री व संबंधित विभागांना निवेदन देऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बरोबर या प्रश्नांसंदर्भात सदाभाऊ खोत यांनी चर्चा केली असून या संदर्भात लवकरच बैठकआयोजित करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे प्रदीर्घ प्रलंबित असणारे खेड तालुक्यातील प्रश्न मार्गीलागतील, अशी आशा लोकांमध्ये पल्लवीत झाल्या असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्न आणि पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भातील प्रश्न यासाठी प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, गजानन गांडेकर, सुभाष पवळे यांनी विशेष पुढाकार घेऊन शेतकरी मेळावा घेतला होता.
0000