खेडच्या पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टीमुळे भात खाचरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी..
खेडच्या पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टीमुळे भात खाचरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी..
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पाईट, आंबोली, वेल्हावळे ( काळोखेवाडी ), शिवे,वाहागाव, कोळीये, देशमुखवाडी, गडद, वांद्रा आदी गावांत मागील दोन दिवसांत झालेल्या अतीवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील पवनचक्कीला जाणाऱ्या रस्त्यामुळे त्या डोंगरातील कड्यांचे पाणी शेतात उलटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या भागात शेतात प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते, परंतु अतिवृष्टीमुळे भात खाचरे वाहून गेली आहेत. या भागातील नुकसानीचे त्वरित पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
येथील शेतकरी श्री. सखाराम लक्ष्मण काळोखे यांच्या 4 भात खाचरापैकी 3 खाचरे ही बांध फुटून आणि माती पिकांत वाहत येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी या पट्ट्यातील नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई करावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
००००