खेड मधील भाजप नेत्याच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव
महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : भाजप नेते व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते शरद बुट्टे पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यांच्या कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये त्यांची आई, भाऊ, पुतण्या, पुतणी यांचा समावेश आहे. त्यांच्या घरातील सर्वांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले असता त्यांचा व त्यांच्या कन्येचा अहवाल निगेटिव्ह आले असून वरील इतरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बुट्टे पाटील व त्यांचे बंधू हे वराळे येथे राहायला असल्याने नेहमीच्या संपर्कामुळे त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. बुट्टे पाटील यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत गरजू व गरीब लोकांसाठी अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर वाटप तसेच कोविड सेंटर मधील रुग्णांना मिनरल वॉटर वाटप आदी सामाजिक उपक्रमातून प्रशासनाच्या खांद्याला खांदा देऊन काम करीत असताना त्यांचा नागरिकांशी संपर्क वाढला होता. त्यामुळे त्यांनी स्वतःहून आपले अहवाल तपासून घेतले.