Saturday, April 19, 2025
Latest:
खेडराजकीयविशेष

खेडमध्ये ‘महाआघाडी’ नाहीच

पंचायत समिती कोठे बांधायची यावरून वाद;१९झाडांची कत्तल
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : राजगुरूनगर शहरातील  १९ झाडांची कत्तल करण्यात आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगुरूगर (खेड) पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या जागेवरून तालुक्यात शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात तू तू मै मै सूरू आहे.
        वृक्षतोडीस हरकत घेतली असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी  बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश  कानडे यांना झाडे तोडण्याचे रीतसर परवानगीचे लेखी आदेश दाखवत कार्यकर्त्यांनी झाडांची कत्तल सुरू केली.सध्या पंचायत समिती मध्ये शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात  काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना  या तिन्ही पक्षांची एकत्रित महाआघाडीची सत्ता असताना खेडमध्ये मात्र या पक्षात टोकाचे  मतभेद आहेत.
        शिवसेनेचे माजी खासदार व आमदार सत्तेत असताना २०१९ साली समितीच्या नूतन इमारतीच्या  कामासाठी मंजूर मिळाली होती शिवसेनेचे माजी खासदार शिवाीराव आढळराव पाटील तसेच आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते भूमिपजन पार पडले होते मात्र विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून दिलीप मोहिते पाटील निवडून आल्यानंतर झाल्यानंतर या कामाला आमदार मोहिते पाटील यांनी विरोध करत  काही दुरुस्ती व तालुक्याची गरज, नागरिकांची सोया लक्षात घेऊन हे काम उभे राहावे अशी भूमिका मांडली. या कामाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले. असे असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत विरोध असणाऱ्या जागेवरील बांधकाम करण्यासाठी झाडांची कत्तल केल्याने सर्व स्तरांतून या बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वृक्षतोड,विरोधाचे  राजकारण यांनी तालुक्यात डोके पुन्हा वर काढले आहे. आगामी काळात यावरून मोठे आरोप प्रत्यारोप होण्याचे संकेत असून खेड तालुक्यात महाआघाडी नाहीच, शिवाय टोकाचं विरोध राजकीय पक्षात असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!