Friday, April 18, 2025
Latest:
आंबेगावआरोग्यकोरोनाखेडखेड विभागजुन्नरपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषवैद्यकीयशिरूरहडपसर

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी ( दि. २६ ) शिरूर लोकसभा मतदार संघात ५ लाख लसीकरणाचे आयोजन, खेड तालुक्यासाठी ५० हजार डोस : अमोल हरपळे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी ( दि. २६ ) शिरूर लोकसभा मतदार संघात ५ लाख लसीकरणाचे आयोजन, खेड तालुक्यात ५० हजार डोसब्ध : अमोल हरपळे

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने व सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने रविवार दि. २६ सप्टेंबर रोजी ५ लाख कोविशील्ड लसचे नियोजन करून देण्यात आले आहे. मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी ५० हजार लसीचे डोस देण्यात येणार असल्याची माहिती जगदंब प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल हरपळे व खासदार कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक प्रबोध सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमाचे उदघाटन खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी खेड तालुक्यासाठी ५० हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले. शिरूर लोकसभा मतदार संघातील खेड-आळंदी सह शिरूर, जुन्नर, आंबेगाव, भोसरी व हडपसर या मतदार संघात प्रत्येकी ५० हजार म्हणजेच ३ लाख डोस व ज्या ज्या ठिकाणी कमी पडेल तिथे आणखी २ लाख डोस असे एकूण ५ लाख डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी जगदंब प्रतिष्ठानला सिरम इन्स्टिट्यूट, नोबेल हॉस्पिटल, जिल्हा परिषद पुणे, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागाचे व खासगी हॉस्पिटल्सचेही सहकार्य लाभले असल्याचे कार्याध्यक्ष अमोल हरपळे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य व जगदंब प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल हरपळे, खासदार कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक प्रबोध सावंत व तेजस झोडगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती अरुण चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती व संचालक बाळशेठ ठाकूर, विलास कातोरे, संचालक धैर्यशील पानसरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, युवक तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, युवा नेते मयूर मोहिते पाटील, महिला तालुकाध्यक्षा संध्या जाधव, राम गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

● ज्या नागरीकांचा पहिला व दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यांनी या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होऊन लसीकरण पुर्ण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

■ खेड तालुक्यात ५० हजार लसी पुढील प्रमाणे उपलब्ध असणार आहेत.
◆ अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – अंबोली केंद्रावर १५०, सुपे येथे १५०, आणि पाळु येथे २००.
◆ डेहणे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – डेहणे केंद्रावर ३००, टोकावडे २००, वाळद १००, नायफड १००, गोरेगाव १०० आणि धामणगाव येथे २००.
◆ कुडे बुद्रुक प्राथमिक केंद्रातंर्गत – कुडे बु.३००, घोटवडी १५०, खोपेवाडी २००, औदर १००, देवोशी १५०, आणि येणवे १००.
◆ कडुस प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – कडुस ३००, सायगाव २००, वडगाव पाटोळे २००, दोंदे ५०० आणि आगरमाथा येथे १५०.
◆ करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – करंजविहिरे १०००, चिबंळी ७००, कुरुळी ७००, निघोजे ६००, नाणेकरवाडी १०००, खराबवाडी १०००, म्हाळुंगे ७००, खालुंब्रे ५००, येलवाडी ६००, वाकी खु.६००, आंबेठाण ६००, वराळे ५००, कोरेगाव खु. ५००, वहागाव ५००, गडद ५००.
◆ पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – पाईट ८००, किवळे ६००, चांदुस ६००, कुरकुंडी ६००.
◆ राजगुरूनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – माता बाल संगोपन केंद्रात २०००, जिल्हा परीषद शाळा नंबर १ मध्ये १०००, जिल्हा परीषद शाळा थिगळस्थळ येथे १०००, मांजरेवाडी १०००, शिरोली १०००, वाकी बु.१०००, राक्षेवाडीमध्ये १०००.
◆ शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – शेलपिंपळगाव १०००, च-होली बु.१०००, बहुळ १०००, गोलेगाव १०००, मरकळ १०००, काळुस १०००.
◆ वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत – वाडा ५००, कडधे २५०, बीबी २५०, चास १०००.
◆ वाफगाव आरोग्य केंद्रातंर्गत – वाफगाव ४००, वरुडे ४००, गुळाणी ४००, कन्हेरसर ६००, रेटवडी ६००, दावडी ६००.
◆ चाकण ग्रामीण रुग्णालय – ५०००.
◆ चांडोली ग्रामीण रुग्णालयात २५००.
◆ आळंदी ग्रामीण रुग्णालयात ३०००
अशा एकुण कोविडशिल्डचे ५० हजार डोसेस उपलब्ध होणार असुन १३ शासकीय मोफत लसीकरण केंद्रासह ५२ गावात लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.
——————————————————–

■ रविवार, दिनांक २६/०९/२०२१ रोजी ठीक सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाकण येथील ग्रामीण रुग्णालय व शहरातील १३ खासगी हॉस्पिटलमध्ये कोविशील्ड लस नागरिकांसाठी मोफत उपलब्ध होणार आहे. लस घ्यायला येताना आपण आपला आधार क्रमांक कोवीन अँप वर रजिस्टर करावा व ज्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनी आधीच्या लसीचे सर्टिफिकेट व आधार कार्ड व लसीकरणासाठी दिलेला मोबाईल क्रमांक सोबत आणावा.

 

लसीकरण साठी डोस उपलब्ध असलेल्या चाकण शहरातील हॉस्पिटलची नावे व पत्ता खालील प्रमाणे :-
———————————————————–
१. संजीवनी हॉस्पिटल, राणूबाईमळा, चाकण
२. रजत हॉस्पिटल, महात्मा फुले चौक, चाकण
३. आवटे हॉस्पिटल, मराठी शाळेशेजारी, चाकण
४. स्पंदन हॉस्पिटल, शिक्रापूर रोड, चाकण
५. हीलिंग हॅन्ड क्लीनिक, गोकुळ कॉम्प्लेक्स, पुणे-नाशिक हायवे, चाकण
६. केअरवेल हॉस्पिटल, एकता नगर, पुणे-नाशिक हायवे, चाकण
७. साईकृपा हॉस्पिटल, चक्रेश्वर रोड, चाकण
८. अरगडे हॉस्पिटल, आंबेठाण चौक, चाकण
९.मुक्ताई हॉस्पिटल, मार्केट यार्ड, चाकण
१०. जनसेवा हॉस्पिटल, दावडमळा, चाकण
११. रिलीफ हॉस्पिटल, नेहरू चौक, चाकण
१२. जयहिंद हॉस्पिटल, शिक्रापूर रोड, चाकण
१३. आरोग्यम हॉस्पिटल, राणूबाई मळा, चाकण
१४. ग्रामीण रुग्णालय, चाकण
लस जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी गोंधळ गडबड न करता लस घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!