खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : खराबवाडीतील वाघजाईनगर येथे विजेची तार अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : खराबवाडीतील वाघजाईनगर येथे विजेची तार अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील वाघजाईनगरच्या हद्दीत दुचाकीहून जाणाऱ्या तरुणाच्या अंगावर विजवाहक तार तुटून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणाचे नाव विशाल बर्मा ( वय २०, रा. हुकूम, सामी, जि. जालोन, उत्तर प्रदेश ) असे आहे. हा मुलगा दवणे वस्ती येथील हर्षद दवणे यांच्या कँटीनमध्ये कामाला होता. एका कंपनीत चहा व नाश्ता देण्यासाठी दुचाकीहून गेला असता अंगावर तार तुटून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उच्च दाबाची वीज वाहक तार तुटली कशी? या तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून होत आहे. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. याबाबत म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद देण्याचे काम सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!