खराबवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतच्या वतीने होतात दररोज कोरोना टेस्ट..
खराबवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतच्या वतीने होतात दररोज कोरोना टेस्ट..
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथे ग्रामपंचायत व करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील एक आठवड्यापासून दररोज सकाळी ९ ते १२ या वेळात कोरोना चाचणी करण्यात येत असून दरदिवशी २५ अँटीजन व २५ आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. हा उपक्रम पुढील महिनाभर राबविण्यात येणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार हॉटस्पॉट गावात दररोज कोरोना टेस्ट करणे सक्तीचे केले असून वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन व ग्रामपंचायत प्रशासक एस. बी. कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गावात करण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये अँटीजन रॅपिड मधील २ व आरटीपीसीआर मधील ६ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी २२ अँटीजन व २५ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, प्रा. आ. केंद्राचे मकसुद शेख, तलाठी एस. बी. आचारी, पोलीस पाटील किरण किर्ते, अजित केसवड आदी उपस्थित होते.
००००