खराबवाडीत बारामतीचा तमाशा
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथे ग्रामदैवत बापुजीबुवा व भैरवनाथ महाराज उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला. उत्सवानिमित्त श्री ची महापूजा, मांडव डहाळे, छबिना पालखी मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
उत्सवात छायाताई खिलारे सह दीपककुमार बारामतीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच जल्लोष अप्सरांचा हा मराठी वाद्यवृंदाचा ( ऑर्केस्ट्रा ) कार्यक्रम संपन्न झाला. कुस्तीच्या जंगी आखाड्यात कोल्हापूर, सोलापूर, नगर, परभणी, पुणे जिल्ह्यासह पंचक्रोशीतील नामांकित पहिलवानांनी सहभाग घेतला.