Saturday, May 10, 2025
Latest:
गुन्हेगारीपश्चिम महाराष्ट्रपुणे जिल्हाविशेषसांगली

खराबवाडीत अल्पवयीन मुलाची ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या,

 जुळ्या भावाने घेतला धसका
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील कुशल स्वर्णाली गृह प्रकल्पाच्या ११ व्या मजल्यावरून अल्पवयीन मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी झाल्याने त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हा मुलगा घरातून वर जाताना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी ( दि. २५ ऑगस्ट ) रोजी रात्री १० वाजून ५ मिनिटांनी घडली. अथर्व विकास पाटील ( वय १४, रा. कुशल स्वर्णाली, चौथा मजला, खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मुळगाव अंजनीगाव, ता. तासगाव, जि. सांगली ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. हा मुलगा आठवीत शिकत होता, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे त्याला आणखी एक जुळा भाऊ असून या घटनेनंतर केवळ तीन मिनिटांत आपल्या जुळ्या भावाला पाहायला तो वरच्या मजल्यावर गेला, आणि ही घटना आपल्या आई वडिलांना प्रथम सांगितली. त्यानंतर हा जुळा भाऊ रात्रभर तापाने फणफणत होता, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सपकाळ हे पुढील तपास करीत आहेत.
error: Content is protected !!