खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करुन सोन्याचे दागिने लुटले, ६ खंडणी बहाद्दर दरोडेखोरांना अटक : म्हाळुंगे पोलीसांची कारवाई
खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करुन सोन्याचे दागिने लुटले, ६ खंडणी बहाद्दर दरोडेखोरांना अटक : म्हाळुंगे पोलीसांची कारवाई
महाबुलेटीन न्यूज
म्हाळुंगे इंगळे ( चाकण ) : खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करुन सोन्याचे दागिने लुटणाऱ्या ६ खंडणी बहाद्दर दरोडेखोरांना म्हाळुंगे पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि ०८/०८/२०२१ रोजी रात्री ८ वा चे सुमारास मौजे भांबोली, ता. खेड, जि. पुणे गाव हद्दीत छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट चौकामध्ये फिर्यादी अक्षय किसन कोळेकर (वय २४ वर्ष) यांची पान टपरी आहे. सदर पान टपरी चालु ठेवायची असेल तर, प्रत्येक महीन्याला १,००० रु. हप्ता दे, अश्या खंडणीची मागणी फिर्यादी अक्षय कोळेकर याचेकडे सराईत गुन्हेगार संतोष मधुकर मांजरे याने केली. परंतु फिर्यादी अक्षय कोळेकर याने सराईत गुन्हेगार संतोष मांजरें यास हप्ता देण्यास नकार दिला व त्याचे विरोधक पार्टीचा सदस्य अनिल धोंडीबा निखाडे यास मदत केली, त्यामुळे चिडुन सराईत गुन्हेगार संतोष मांजरे याने त्याचे इतर ९ ते १० साथीदारांसह येवुन फिर्यादी अक्षय किसन कोळेकर व त्याचे मित्र जीवन मधुकर पवार, सचिन ज्ञानदेव बोत्रे यांना पिस्टलचा धाक दाखवुन लोखंडी कोयते, लाकडी दांडके यांनी डोक्यात, हातापायावर मारहाण करुन गंभीर दुखापत केली. तसेच जीवन मधुकर पवार याचे गळयातील ४०,००० रु. किमतीची सोन्याची चैन, सचिन ज्ञानदेव बोत्रे याचे गळ्यातील २०,००० रु. किंमतीची सोन्याची चैन असा ६०,००० रु. सोन्याचा ऐवज जबरदस्तीने दरोडा घालुन लुटला. सदर घटनेबाबत चाकण पो.स्टे येथे गुन्हा रजि.नंबर ९६० / २०२१ , भा.द.नि.क -३ ९ ५ , ३ ९ ७ , ३८७ , ३४१ , आर्म अक्ट , ३ ( २५ ) , ४ ( २५ ) क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा.पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, मा.पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ १ श्री मंचक इप्पर साहेब यांनी गुन्हयातील आरोपींचे शोधा करीता दिलेल्या सुचना प्रमाणे म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पो.निरी अरविंद पवार व पोलीस निरीक्षक गुन्हे ) दशरथ वाघमोडे , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.निरी , दत्ताञय गुळीग यांनी दोन पथक नेमुन आरोपीचा शोध घेवुन आरोपींना जेरबंद केले . त्यांची मा.कोर्टाकडुन पोलीस कस्टडी रिमाड घेतली आहे.
● गुन्ह्यातील अटक आरोपी :-
१ ) आकाश बाळासाहेब शेळके, वय २५ वर्ष , रा. कोरेगाव खुर्द , ता. खेड , जि. पुणे
२ ) गणेश बबन डांगले, वय २० वर्ष , रा. गवारवाडी, पाईट, ता. खेड, जि. पुणे
३ ) नारायण सुनिल घावटे, वय २१ वर्ष, रा. शेलु , ता. खेड , जि. पुणे
४ ) गणेश हिरामन लिंभोरे, वय २० वर्ष, रा- शेलु , ता. खेड , जि. पुणे
५ ) विठ्ठल नवनाथ पिकळे, वय २१ वर्ष, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड , जि. पुणे
६ ) साईनाथ रामनाथ राऊत, वय ३० वर्ष, रा. भांबोली , ता. खेड , जि. पुणे
● फरार आरोपी
१ ) संतोष मधुकर मांजरे, रा. कोरेगाव खुर्द , ता. खेड , जि. पुणे
२ ) प्रदीप अरुण पडवळ, रा. बोरदरा , आंबेठाण, ता. खेड , जि. पुणे
३ ) सुमीत भोकसे , रा. कुरकुंडी , ता. खेड , जि. पुणे
४ ) इतर अनोळखी इसम
● जप्त हत्यारे :- ३ लोखंडी कोयते, ४ लाकडी दांडके, ३ मोटार सायकली.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश , मा अपर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे , मा पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे) श्री सुधीर हिरेमठ , मा.पोलीस उप आयुक्त , परिमंडळ श्री मंचक इप्पर , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे , महाळुगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग , पोलीस हवालदार चंदु गवारी , राजु जाधव , राजु कोणकेरी , अमोल बोराटे , विठ्ठल वडेकर , शिवाजी लोखंडे , संतोष काळे , श्रीधन इचके , हिरामन सांगडे , शरद खैरे यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अमलदार सचिन सुर्यवंशी हे करीत आहेत.
००००