काव्यमंच : येवो सुखना बी दिन
[अहिरानी (खानदेशी) बोली भाषा]
कोठे पूर महापूर
सरी जायी वनवास
देखा उना रे उना रे
उना सरावन मास॥धृ ॥
यानी झिमझिम झडी
ऊन पडस बी खास
माले आसा आवडस
देखा सरावन मास॥१॥
यानी मनम्हा जगाडी
मन्हा माहेरनी आस
उनी राखीनी बी पुनी
आडा कोरोना बी व्हस॥२॥
आठे तठे हिरवयं
मन मन्हं निवायस
पन माय माहेरले
नही जावाले भेटस ॥३॥
कोरोनानी भेटनी वं
कोन्ही म्हने आत्ये लस
आत्ये सुखना यिथिन
दिन माले बी वाटस॥४॥
–सौ मंगला रोकडे.