कवयित्री मंगला रोकडे यांची ऑल इंडिया महात्मा जोतिबा फुले युवा मंचच्या राज्य महिला प्रदेश सल्लागार पदी नियुक्ती
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
धुळे : येथील कवियित्री निसर्ग सखी सौ. मंगला मधुकर रोकडे यांची ऑल इंडिया महात्मा जोतिबा फुले युवा मंचच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेश सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे.
मंचचे राष्ट्रीय महासचिव नरेंद्र बागूल, संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण आनंदा महाजन यांनी त्यांना निवड पत्र दिले आहे. मंगलाताई रोकडे यांच्या लेखनातील समाज प्रबोधनपर विचार लक्षात घेऊन मंचच्या कोअर कमिटी तर्फे ही निवड करण्यात आली. धुळे, जळगाव आणि महाराष्ट्र राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनांचे वर्षाव होत आहेत.