काळुस येथे तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून,
काळुस परिसरात खळबळ, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
काळुस : येथील वाटेकरवाडी ( ता. खेड ) गावच्या हद्दीत २१ वर्षीय तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा खून मंगळवारी ( दि. १७ ) रात्रीच्या सुमारास झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून बुधवार ( दि. १८ ) सकाळी उघडकीस आला आहे. अनिकेत प्रकाश पवळे ( वय २१, रा. काळुस, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाटेकरवाडी येथील बैलगाडा घाटाजवळील माळरानावर हा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे आढळले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे व त्यांचे पथक अधिक तपास करीत असून तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
—