जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हेमाताई राम कांडगे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग अध्यक्ष, खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार रामभाऊ कांडगे यांच्या पत्नी व चाकण येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हेमाताई राम कांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दीर, एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्री राजर्षी श्री शाहू प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष राजेश कांडगे यांच्या त्या मातोश्री होत.