ज्या प्रवर्गाचा सरपंच, त्याच प्रवर्गाचा प्रशासक नियुक्त करा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
मुंबई : जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करताना गावात सरपंच पद ज्या प्रवर्गाला राखीव आहे, त्याच प्रवर्गाचा प्रशासक नियुक्त करावा, त्यामुळे इतर घटकांवर अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
अनेक गावांमध्ये सरपंच पद हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण साठी आरक्षित आहे. त्या गावात त्याच प्रवर्गाला प्रशासक पदासाठी संधी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असून पालकमंत्री यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय झाला असला तरी सर्व प्रवर्गाला न्याय मिळावा, असे त्यांचे म्हणणे आहे.