जिल्हास्तरीय अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत येलवाडीचा ईशांत शंकर बोत्रे प्रथम
जिल्हास्तरीय अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत येलवाडीचा ईशांत शंकर बोत्रे प्रथम
महाळुंगे इंगळे : पुणे जिल्हा ज्युनिअर अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत येलवाडी ( ता. खेड ) येथील ईशांत शंकरराव बोत्रे याने प्रथमक्रमांक पटकावला. ईशांत बोत्रे हा निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात शिक्षण घेत असून तो प्राचार्य मनोज देवळेकर, प्रशिक्षकमहेश सुतार, शिक्षक भगवान सोनवणे, शिक्षिका मेघना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या स्पर्धेत गोळाफेक क्रीडाप्रकारात ईशांतने प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाचे येलवाडी ग्रामस्थांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.