जेष्ठ नागरिक दिनानिमित्त महिंद्राच्या वतीने आदिवासी वृद्धांना काठी व फळवृक्ष वाटप
महाबुलेटीन न्यूज
जुन्नर /आनंद कांबळे : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी डोंगराळ भागातील निराधार गरजू आजी-आजोबांना चाकण येथील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह गिअर्स डिव्हिजन या संस्थेच्या माध्यमातून वापरण्यास सोपी, हलकी व कमी जास्त करता येईल, अशी आधारासाठी काठी मोफत देण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येकाला एक फळवृक्ष रोपटे सुद्धा देण्यात आले. विशेषता पश्चिम भागातील घंगाळदरे शिरोली चावंडची खडकवाडी फांगुळगव्हाण मधील वृद्धांना काठ्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात सामाजिक अंतराचे भान देऊन महिंद्रा कंपनीचे अधिकारी रोहित लांमखेड, प्रशांत शर्मा, जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, राजाराम पाटील, वृद्धाश्रमाचे संचालक संदीप पानसरे, श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारूंडेचे माजी मुख्याध्यापक फकीर आतार, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथील प्रमुख अर्चना पवार, शंकर महाजन पवार, अमोल शिंदे, घंगाळदरेचे माजी उपसरपंच बाळू तळपे आदी मान्यवर उपस्थित होते.
काठी वाटपासाठी वसतिगृहातील अर्चना मिननाथ दिघे, प्रियांका देवराम शेळकंदे, रेश्मा शेळकंदे, हर्षदा भालचीम, मयुरी बुळे, कोमल बुळे यांनी गावातील आजी-आजोबांची यादी करून त्यांना मदत पोहोचविण्यासाठी मदत केली.