जेष्ठ नेते सोपान घनवट यांचे निधन
जेष्ठ नेते सोपान घनवट यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चास पंचक्रोशीतील शिवसेनेचे जेष्ठ नेते सोपान नामदेव घनवट (वय ५७ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस, खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक म्हणून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम केले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.