Sunday, August 31, 2025
Latest:
इतर

जनकल्याणाच्या योजना भाग – २ : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दोन दुभत्या जनावरांचे गट वाटपाची योजना

जनकल्याणाच्या योजना भाग२ : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दोन दुभत्या जनावरांचे गट वाटपाची योजना

*योजनेचे स्वरुप*

अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरांची गट वाटपयोजना. दोन एच. एफ. किंवा जर्सी जातीच्या दोन संकरित गाई किंवा मुऱ्हा अथवा जाफराबादी या सुधारित जातीच्या दोन म्हशी, किंवागीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ डांगी प्रजातीच्या दोन देशी गाई वाटप योजनेंसाठी ७५टक्के अर्थसहाय्य.

*लाभार्थी निवड प्रवर्ग*

     *अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील :*

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी,

अत्यल्प, अल्प  भूधारक,

रोजगार स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार

वरील सर्व वर्गात मोडत असलेले महिला बचत गटातील लाभार्थी

*अटी शर्ती*

अर्जदाराचे वय किमान १८  वर्ष पूर्ण असावे

लाभार्थी निवडतांना ३० टक्के महिला आणि टक्के दिव्यांगांना प्राधान्य.

आधारकार्ड, मोबाईल नंबर, /१२ उतारे अनिवार्य.

शिधापत्रिकेची सत्यप्रत, राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यप्रत, अर्जदाराचे छायाचित्र, जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दारिद्र्यरेषेखालील असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दाखला.

लाभार्थ्यांची निवड झाल्यावर एका महिन्यात लाभार्थ्यांचा हिस्सा किंवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक.               

*अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा पशुधन विस्तार अधिकारी, तालुका पंचायत समिती*

0000

चाकण येथील घनवट प्लाझा मध्ये शॉप भाड्याने देणे आहे… संपर्क 9822364218

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!