Thursday, April 17, 2025
Latest:
उदघाटनउद्योग विश्वखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेषव्यापार/वाणिज्य

जैवइंधन हे भविष्य असून आपल्याकडे निर्यातीची प्रचंड क्षमता : नितीन गडकरी भारतातील पहिले लिक्विफाईड नॅच्‍युरल गॅस (एलएनजी) प्लॅन्टचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

जैवइंधन हे भविष्य असून आपल्याकडे निर्यातीची प्रचंड क्षमता : नितीन गडकरी
भारतातील पहिले लिक्विफाईड नॅच्‍युरल गॅस (एलएनजी) प्लॅन्टचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

महाबुलेटीन न्यूज

चाकण एमआयडीसी : “जैवइंधन हे भविष्य आहे आणि आपल्याकडे निर्यातीची प्रचंड क्षमता आहे. ते अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. उद्योगासाठी मोठ्या संधी आहेत आणि आम्ही प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना मी भविष्याबद्दल उत्सुक आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

चाकण एमआयडीसीतील निघोजे ( ता. खेड ) येथील भारतातील पहिले लिक्विफाईड नॅच्‍युरल गॅस (एलएनजी) इंधनयुक्‍त ग्रीन ट्रक उत्‍पादन करणाऱ्या ब्ल्यू एनर्जी मोटर्स या प्लॅन्टचे उदघाटन गडकरी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले, “देशातील पहिला एलएनजी ट्रक लॉन्च करणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे भविष्यासाठी इंधनआहे. हे किफायतशीर आणि वाहतूक क्षेत्रासाठी बदल घडवणारे आहे. जेव्हा आपण खूप आयात करतो तेव्हा पेट्रोल आणि डिझेलला हाएक उत्तम पर्याय आहे. एलएनजीसह, बचत होईल आणि आम्ही आमच्या लॉजिस्टिक खर्चात १६% कपात करू, आणि पुढे ते १०% पर्यंत खाली आणू, जे आमचे लक्ष्य आहे. आम्ही महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणामध्ये बायोमासपासून एलएनजी आणि सीएनजीबनवत आहोत. वर्षात आमच्याकडे देशात २०० पेक्षा जास्त क्षमता असतील.”

ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध भुवाल्‍का या उत्‍पादन प्‍लाण्‍टच्‍या घोषणेबाबत बोलताना म्‍हणाले, ‘’आज आम्‍हीचाकण, पुणे येथे उद्घाटन केलेले भारतातील पहिले एलएनजी ट्रक उत्‍पादन प्‍लांट ग्रीन ट्रकिंग क्रांतीमध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याच्‍या दिशेनेआमचे पहिले पाऊल आहे. ब्‍ल्‍यू एनर्जी मोटर्स येथे आमचा त्‍वरित सोल्‍यूशन देत आणि आर्थिक परताव्‍यांमधील अडथळे दूर करतपर्यावरणामधील कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याचा मनसुबा आहे.’’

“आम्‍हाला आनंद होण्‍यासोबत अभिमान वाटतो की, ब्‍लू एनर्जी मोटर्सने भारतीय व्‍यावसायिक परिवहनामधील या प्रमुख क्रांतीसाठीआम्‍हाला निवडले आहे,” असे आयवेको ग्रुप पॉवरट्रेन बिझनेस युनिटचे अध्‍यक्ष सिल्‍वेन ब्‍लेझ म्‍हणाले.

हा करार आता एफपीटी इंडस्‍ट्रीयलसाठी अत्‍यंत महत्त्वाचा आहे आणि भविष्‍यात आमच्‍या आघाडीच्‍या तंत्रज्ञानांनी जगातील सर्वातमोठ्या वाहन बाजारपेठेच्‍या पर्यावरणीय परिवर्तनाला पाठिंबा देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजवावी, अशी आमची इच्‍छा आहे.”

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!