आय एन एस विक्रांतच्या निर्मितीमध्ये शिवे गावच्या तरुणाचे योगदान
आय एन एस विक्रांतच्या निर्मिती मध्ये शिवे गावच्या तरुणाचे योगदान
चाकण एमआयडीसी : आय एन एस विक्रांतच्या निर्मितीमध्ये खेड तालुक्यातील शिवे गावच्या तरुणाचे योगदान लाभले आहे. भारतीय नौदलात आय एन एस विक्रांत मोठ्या दिमाखात दाखल झाली. या युद्धनौकेचं वैशिष्ट्य म्हणजे २३ विमानं या युद्धनौकेवरून झेपावू शकतात. शत्रूच्या काळजात धडकी भरेल अशी ही संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानी देशभक्त तरुणाचा स्वाभिमान जागृत करणारी आहे.
या युद्धनौकेसाठी खेड तालुक्यातील शिवे गावचे सुपुत्र, तरूण उद्योजक, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळ व कै. रामचंद्र महादेव गडदेस्मृती वाचनालयाचे संचालक दिपक शंकर गडदे याच्या कंपनीमधून महत्वाचे काही ड्रिलींगचे काम झाले आहे.
शिवे गावासाठी निश्चित पणे ही अत्यंत अभिमान व गौरवास्पद कामगिरी असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या असून दिपक गडदेचे सर्व ग्रामस्थांकडून हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे.
0000