एच.आय.व्ही सहजीवन जगणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय साहित्य वाटप वितरण संपन्न

देशात कोविड -१९ ने थैमान घातले आहे. या परिस्थितीत डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी या कोविड योध्यांनी मोलाचा सहभाग दर्शिवला आहे. त्याच बरोबर महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण ता. खेड यांनी देखील या परिस्थितीत सामाजिक कार्यात सहभाग दाखवला आहे.
महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खेड तालुक्यामध्ये एच.आय.व्ही. / एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात आहे. कोविड-१९ चे प्रमाण वाढत असताना एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या मुलांना पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे आहे. काहीं मुलांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. घरात राहून घरात किराणा भरणे खूप मुश्किल आहे. त्यासाठी महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशनने दिनांक ०१/०७/२०२० ते १२/०७/२०२० पर्यंत एच.आय. व्ही. सहजीवन जगणाऱ्या मुले आणि पालक यांच्या घरो घरी जाऊन सोशल डिस्टेनसिंगचे पालन करत एच. आय. व्ही सहजीवन जगणाऱ्या ६५ बालकांच्या घरी जावून पोषण आहार वाटप केले. सदर पोषण आहार खेड तालुक्या मध्ये वाटप करण्यात आला.
कोरोना ( कोविड -१९ ) च्या परिस्थतीतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने टाळेबंदी केली आहे, अशा परिस्थितीत शाळा चालू करण्याचे आदेश सरकारने दिलेले नाहीत, मात्र शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण प्रणालीची सुरुवात केली आहे. एच. आय. व्ही सहजीवन जगणाऱ्या मुलांना महिंद्रा दरवर्षी शालेय साहित्यांच्या द्वारा शैक्षणिक सहकार्य करीत असते. यावर्षी टाळेबंदीच्या काळात देखील महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन द्वारा एच.आय. व्ही. सहजीवन जगणाऱ्या १५० मुलांना घरोघरी जाऊन शालेय साहित्य वाटप करण्यात आले. उतीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचाली करिता प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी आणि भावी आयुष्यात त्यांनी चांगले शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठावे या उद्देशाला डोळ्यासमोर या उपक्रमाचे अयोजन करण्यात आले.
तसेच रवींद्र पाटील यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचाली करिता प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी या उद्देशाला डोळ्यासमोर ठेवूनच कोविड -१९ च्या परिस्थितीत मुलांनी घरी राहून अभ्यास करावा आणि यशस्वी व्हावे म्हणून घरोघरी जावून सोशल डिस्टेनसिंग पाळून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला होता.
तसेच सनी लोपेझ यांनी उत्तीर्ण विद्यार्थी यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या, विद्यार्थी किती गुण मिळवतो हे महत्वाचे नसून, त्याने मिळवलेल्या यशाचे कौतुक होणे फार गरजेचे आहे त्यासाठी महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. कंपनी सदैव प्रयत्न करेल असा विश्वास दिला. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून अभिनंदन करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी सनी लोपेझ ( महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्सचे अधिकारी ) व यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यश फौंडेशनचा स्वयंसेवक वर्ग उपस्थिती होता.