Sunday, April 20, 2025
Latest:
इंदापूरदिन विशेषविशेषसण-उत्सवसामाजिक

गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : गुरु पौर्णिमेनिमित्त इंदापूर विचार मंथन परिवाराच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. येथील राधिका हाॅलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रा.उत्तमराव मोरे, निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश सुर्यवंशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या वेळी बोलताना सन्मानमुर्ती माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे म्हणाले की,जन्मापासून संपर्कात येणा-या प्रत्येकाकडून आपण काही तरी शिकत असतो. आई व अनुभव हेच आपले खरे गुरु असतात.जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. गुरुकडून मिळालेली विद्या शिष्याने उपयोगात कशी आणली ते पहाणे महत्वाचे असते.
निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश सूर्यवंशी म्हणाले की, निसर्गातला प्रत्येक घटक आपणास शिकवण देत असतो. त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगून त्यास गुरुस्थानी मानले पाहिजे.
या कार्यक्रमात प्रा. कृष्णा ताटे, उत्तमराव मोरे, जयंत नायकुडे, दत्तात्रय दडस, शरद झोळ, विनय थोरात, प्रा. अशोक मखरे, सुहास मोरे, संदिपान कडवळे, दत्तात्रय गवळी आदिंचा सत्कार करण्यात आला.
‘इंदापूर मिरर’ या साप्ताहिकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. तसेच पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, दादासाहेब सोनवणे, विशाल चव्हाण, शिवाजी मखरे, वाल्मिक खानेवाले, नितीन आरडे, महादेव लोखंडे व इतर सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब सरवदे यांनी केले. पत्रकार सुधाकर बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. तर शिवाजीराव मखरे यांनी आभार मानले.
इंदापूर विचारमंथन परिवारातर्फे नेहेमीप्रमाणे कोरोनासंदर्भातील शासकीय नियमाचे काटेकोर पालन करुन हा कार्यक्रम पार पडला. या ग्रुपने स्थापनेपासून महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम, लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याचे कीट, सॅनिटायझरचे वाटप, कोरोना बीमोडासाठी कार्य करणारांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम साजरे केले आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त ग्रुपचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांचा सर्व सदस्यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!