घरात घुसले पावसाचे पाणी, ग्रामपंचायतने त्वरित दखल घेण्याची मागणी
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
घोटावडे : बुधवारी ( दि. ९ ) अचानक आलेल्या पावसामुळे भेगडेवाडी ( ता. मुळशी ) येथील रोहिदास श्रीपती भेगडे यांच्या घरात डोंगराचे पाणी शिरले. पाणी जाण्यासाठी मोऱ्या नसल्यामुळे ते पाणी थेट घरात शिरले. घरात पाणी शिरल्याने घरातील किंमती वस्तू भिजून नुकसान झाले आहे. सदरहू कुटुंबांना ह्या संकटाला वेळोवेळी सामना करावा लागत असून ग्रामपंचायततीने यात जातीने लक्ष घालून त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.