एका तासाच्या अंतराने बहिण-भावांनी घेतला जगाचा निरोप
एका तासाच्या अंतराने बहिण भावांनी घेतला जगाचा निरोप
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : एकाच आईच्या उदरी जन्मलेल्या, एकाच गावात उभे आयुष्य काढलेल्या बहिण-भावांचा अंतही एका तासाच्या अंतराने झाला. त्यांचा अंत्यविधीही एकाचवेळी झाला. कालठण नं.१ ( ता.इंदापूर ) येथे आज ( दि.२२ ऑगस्ट ) रोजी ही ह्रदयद्रावक घटना घडली.
येसूबाई सपकळ या वयाची शंभरी पार केलेल्या आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी त्यांचे लहान बंधु रामदास चोरगे (वय ९७ वर्षे) हे काल त्यांच्या घरी गेले होते. प्रकृतीची विचारपूस करुन हे बहिण-भाऊ काही काळ भूतकाळात रमले.
आज दुपारी रामदास चोरगे यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या एक तासाभरात येसूबाई सपकळ यांनी ही जगाचा निरोप घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत अतूट राहिलेल्या त्यांच्या नात्याच्या दर्शनाने तमाम कालठणकरांचे डोळे पाणावले.

—–