Sunday, April 20, 2025
Latest:
जिज्ञासाविशेष

दुनिया अनमोल रत्नांची : समुद्रअंतरीचा लोभस खजिना ‘पोवळे’

आजचा लेख कदाचीत खुप किचकट आणि खोल वाटू शकतो पण काय करणार लेख पोवळ्याविषयी आहे.आणि पोवळे देखील खोल समुद्राच्या तळाशीच मिळते.पोवळे हे समुद्रातील जीवापासून तयार होणारे रत्न आहे.म्हणून या रत्नाचे वर्गीकरण जैविक रत्नात केले जाते. पोवळ्यास संस्कृत भाषेत प्रवाळ, विद्रुम असे संबोधतात. इंग्रजी भाषेत Coral तर हिंदी मध्ये मुँगा असे म्हटले जाते.
सिलेंटेरेटा,अँथोझोआ,हायड्रोझोआ या प्रवर्गातील प्राण्यांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या बाह्यकंकालाचे उबदार सागरात साठे म्हणजे पोवळे होय. एकप्रकारची समुद्र पुष्पेच म्हणू आपण त्यांना. आता हा कंकाल तयार कसा होतो याचा काही निश्चित अभ्यास नाही. परंतू बाह्यस्तराभोवती स्त्रवलेल्या कलिल आधारद्रव्यात कँल्शीअम स्फटिकांचे अवक्षेपण होऊन कंकालनिरर्मिती होते असे आम्ही रत्नशास्त्राचा अभ्यास असणारी मंडळी मानतो.
                अशा प्रकारच्या पोवळ्याच्या भिंतीचभिंती आपणांस फ्लाँरिडा,वेस्ट इंडिज,अफ्रिकेचा पुर्व किनारा, स्पेन आदि ठिकाणी पहायला मिळतील.स्कूबा डाईव्हींग करणारे पर्यटक हे आवर्जून पहायला जातात. परंतू उपयोगात येणारी उच्च प्रतिची पोवळी इटली,नेपल्स,सिसिलिया, जापान,श्रीलंका  इ. देशात मिळतात. अगदीच आठवले म्हणून सांगतो महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ देखील एक स्कुबा डाईव्हींग चा स्पाँट आहे.तिथे देखील पोवळ्याचे खडक पहावयास मिळतात.
 चांगले पोवळे ओळखावे कसे ? याला काही विशिष्ट प्रकारची पध्दत नाही परंतू पोवळे खरेदी करताना नेहमी लालसर शेंदरी रंगाचेच पोवळे घ्यावे. एरवी बाजारात कुंकवापेक्षादेखील लालभडक रंगाची रत्न पोवळी म्हणून विकण्याचा प्रकार सर्रास होत असतो.पण ती खरेअर्थी पोवळी नसतातच.कोरीवकाम करुन पोवळ्याचे शोपीस बनवतात. असे कोरीवकाम करताना जो चुरा पडतो तो वाया जाऊ नये म्हणून त्यापासून ही अशी पोवळी बनवली जातात.आमच्या रत्नशास्त्रात त्याला  ” Powder coating coral ”  असे म्हणतात.साधारणपणे २० ₹ प्रमाणे या पोवळ्याची किंमत असते.
कोरीवकामाबद्दल बद्दल विषयच निघाला आहे तर आणखी एक गोष्ट सांगतो. पोवळ्यावर गुलाबाच्या फुलाप्रमाणे कोरीवकाम केले जाते व सोन्यात जडवून कर्णफुले करता येतात. तसेच गणेशभक्तांसाठी पोवळ्यावर गणपती कोरले जातात. महाराष्ट्रात विशेष नाही परंतु द.भारतात पोवळ्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. द.भारतीय स्त्रिया मंगळसूत्रात पोवळे वापरतातच.
 आयुर्वेदात देखील पोवळे अतिशय औषधी गुणधर्म सांगितले आहेत. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तशुद्धी साठी पोवळे अतिशय गुणकारी समजले जाते. अस्थिविकार, कफ आणि पित्त प्रव्रुत्ती असणारांनीही पोवळे वापरावे.
     ज्योतिषशास्त्रानूसार मंगळ ग्रहाचे रत्न समजले जाते पोवळे.म्हणून पोवळे वापरताना गुरुजींच्या सल्ल्यानुसार पोवळे वापरावे. म्हणजे त्याचे योग्य ते फायदे आपणांस नक्कीच होतील.
श्री गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरुनगर
९६५७३२२१०२ /९८२२७९९८९८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!