जयंतीपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासन व समाज कल्याण विभागाच्या वतीने अभिवादन…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले अभिवादन 

महाबुलेटीन न्यूज 
पुणे दि.14: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री श्री. रमेश बागवे, राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रमानंतर राज्यमंत्री श्री. विश्वजीत कदम यांनी राज्याचे मुख्यालय असलेल्या समाज कल्याण आयुक्तालयात देखील भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन :- 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पुणे शहर तहसीलदार श्रीमती तृप्ती कोलते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!