जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे अभूतपूर्व योगदान… सेवाव्रती कोरोनायोद्धा, अन् न थकलेले हात…
जिल्हा माहिती कार्यालयातील वृषाली पाटील, गणेश फुंदे, विशाल कार्लेकर व विलास कसबे यांचेही जबाबदारीपूर्ण योगदान..

महाबुलेटीन नेटवर्क
पुणे : देशावर कोरोनाचे संकट आले आणि संपूर्ण देशालाच गेली तीन महिने कुलुपबंद व्हावे लागले आहे. या काळात सर्वसाधारण माणसावर संकटाची कुर्हाड कोसळली. आजही देशापुढेचे संकट दूर झाले नाही. परंतू या सर्वसामान्य माणसाला याही परिस्थितीत जगण्याची आशा निर्माण करत आहे ते या काळात त्यांच्यापर्यंत पोहोचणारी माहिती. त्यांचे विविधी मार्गाने होणारे प्रबोधन.
या काळात कोरोना योद्धे म्हणुन देशाने पोलीस, डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांचेच आभार व्यक्त केले, त्यांचा गौरव केला. पण याही पलिकडे कोरोना योद्धे म्हणुन इतरही काही लोक निस्पृहपणे आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. यात मनापासून गौरव करावा असे काम करत आहेत शासनाच्या माहिती विभागातील विद्यमान प्रभारी उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी स्वयंस्फुर्त संचारबंदीची घोषणा केली, तर २४ मार्च रोजी २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहिर केला. मात्र असे असले तरी १० मार्च रोजी पुणे शहरात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण आढळून आले. दुबई येथे जाऊन आलेले दोन जण कोरोना रुग्ण आढळून आल्याने नायडू हॉस्पिटल विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले. आणि लगेचच पुढील गंभीर स्थितीचे आवलोकन करुन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी आपल्या कर्तव्यांची व जबाबदारीची मांडणी केली. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांचे संपर्कात सातत्याने राहत त्यांनी कोरोनासंदर्भातील शासन स्तरावरील उपयोजनांची माहिती प्रासरमाध्यमांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ते यथोचित पार पाडू लागले.
तसे पाहिले तर संपूर्ण राज्यात स्वयं शिस्तीने तसेच उच्चपदस्थ अधिकार्यांबरोबर विचार विनिमय साधत चोखपणे काम पार पाडण्याचे काम पुण्याच्याच जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे. या जबाबदारीपूर्ण कामामुळे माहितीच्या दळवळणातील कोणतीही संभ्रमावस्था प्रसारमाध्यमात राहिली नाही. व शासनाचे धोरण अधिकार्यांच्या उपाययोजन लेाकांपर्यंत पोहचत आहेत. हे चित्र राज्यात इतरत्र दिसत नाही. अनेक जिल्ह्यात योग्य माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाही असे आरोप होऊ लागले आहेत व त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे. असे पुण्यात घडले नाही त्याचे उत्तर केवळ राजेंद्र सरग व त्यांची टीम आहे.
जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहाय्यक गणेश फुंदे, माहिती सहाय्यक विलास कसबे व सर्वसाधारण सहाय्यक विशाल कार्लेकर या सर्वांनीच कर्तव्य म्हणुन आपली जबाबदारी पार पाडली आहे व पाडत आहेत.
कोरोना रुग्णांच्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला पाच पथकांची निर्मिती केली. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला. या पथकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्याकडून आलेल्या माहितीचे व्यवस्थीत पृथ्थकरण करुन ती लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सरग यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयात सुरु झाले. कोरोना रुग्णांची काळजी व इतर जबाबदार्या प्रशासनाला जेवढ्या कौशल्याने पार पाडाव्या लागल्या त्यापेक्षा अधिकच जबाबदारी यासंदर्भाताील योग्य माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी राजेंद्र सरग व त्यांच्या टीमला पार पाडावी लागत आहे. कारण एक छोटी चूक सुद्धा समाजात अस्थैर्य व उद्रेक निर्माण करु शकते याची जाणीव राजेंद्र सरग यांनी आपल्या टीमला करुन देवून त्या पद्धतीने आपले काम ते पार पाडत आहेत.