कोरोनाचे वैश्विक महामारीचे संकट जावो
कोरोनाचे वैश्विक महामारीचे संकट जावो
: हर्षवर्धन पाटील यांचे श्रीगणेशाकडे साकडे
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : कोरोनाचे वैश्विक महामारीचे संकट लवकरात लवकर जावो. कारखान्याचे सर्व सभासद व नागरिकांना निरोगी आरोग्य व सुखसमृध्दी लाभो. वरुणराजाची उत्तम कृपादृष्टी होवो, असे साकडे माजी मंत्री व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी श्रीगणेशाच्या चरणी आज ( दि.२६ ऑगस्ट ) घातले.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रीगणेशाची आरती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे साकडे घातले. कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांचे हस्ते काल गणेश आरती झाली होती.
कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा याचा काटेकोर वापर करण्यात आला होता.
_________________