कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २४ ॲागष्ट २०२० ) धक्कादायक : तालुक्यात आज तब्बल ९३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, तीन जणांचा मृत्यू
कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २४ ॲागष्ट २०२० )
धक्कादायक : तालुक्यात आज तब्बल ९३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २६१३,
चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत एकूण ४९ रुग्ण, ग्रामीण भागात ४४ रुग्णांची वाढ,
तीन जणांचा मृत्यू, दिलासादायक : २०७२ रुग्ण बरे होऊन गेले घरी, चाकण, आळंदी व नाणेकरवाडीत सर्वाधिक रुग्ण
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २४ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज नव्याने ९३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून रासे, भोसे व चाकण येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतच आहे. तालुक्यात २०७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. चाकण, आळंदी व राजगुरुनगरला सर्वाधिक रुग्ण आढळले असून तीन शहरात एकूण ४९ रुग्ण आढळले आहेत. नाणेकरवाडीत तब्बल १२ रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात ४४ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २६१३ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४९ ) : राजगुरूनगर – ८, चाकण – २३, आळंदी – १८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४४ ) : नाणेकरवाडी १२, मेदनकरवाडी ७, कान्हेवाडी तर्फे चाकण ३, भोसे ३, गोलेगाव ३, रासे ३, कडाचीवाडी २, कुरुळी २, महाळुंगे इंगळे २, वडगाव घेनंद २, तर बिरदवडी, वाकी खुर्द, काळुस, शेलपिंपळगाव व सातकरस्थळ या ५ गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ९३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २६१३
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ६८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४७३
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २०७२
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण २३, आळंदी १८, नाणेकरवाडी १२.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०३ ( १ भोसे वय ६७, १ रासे वय ४८, १ चाकण वय ७२ )
————
एकदम छान माहिती मिळते अतिशय सुंदर