कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ९ सप्टेंबर २०२० ) – चिंताजनक : खेड तालुक्यात आज १३७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, आळंदीतील एक, तर कुरुळीतील दोन जणांचा मृत्यू,
आळंदी व चाकण शहरात आज सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ४२७४,
३३७७ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ६८, तर ग्रामीण भागात ६९ रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ९ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १३७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. चाकण शहरात सर्वाधिक २९ व आळंदीत ३० रुग्ण आढळले असून आळंदी शहरात ५० वर्षीय पुरुषाचा व कुरुळीतील एक पुरुष व एक महिला असा एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ३३७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ६८, तर ग्रामीण भागात ६९ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४२७४ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ६८ ) : राजगुरूनगर – ९, चाकण – २९, आळंदी – ३०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ६९ ) :
# मेदनकरवाडी – १४, नाणेकरवाडी – ७, कडाचीवाडी – ६, खराबवाडी – ६, कुरुळी – ४, केळगाव – ४, मरकळ – ३,
# २ रुग्ण असलेली गावे : चांडोली, आंबेठाण, चिंबळी, पिंपळगाव गोलेवाडी, शेलपिंपळगाव
# १ रुग्ण असलेली गावे : दोंदे, बिरदवडी, महाळुंगे इंगळे, निघोजे, सावरदरी, येलवाडी, कोरेगाव खुर्द, कोमलवाडी, मांजरेवाडी, संतोषनगर, शिरोली, होलेवाडी, राक्षेवाडी, सातकरस्थळ, भोसे
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १३७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ४२७४
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ९५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ८०२
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३३७७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – ३०, चाकण – २९, मेदनकरवाडी – १४
# मयत झालेल्या व्यक्ती : ०३
# १ पुरुष – वय ५०, रा. आळंदी – वायसीएम रग्णालय – ७ सप्टेंबर,
# १ महिला – वय ७५, रा. कुरुळी – वायसीएम रुग्णालय – ८ सप्टेंबर,
# १ पुरुष – वय ६०, रा. कुरुळी, गुंजकर हॉस्पिटल – ९ सप्टेंबर