कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २ सप्टेंबर २०२० ) – राजगुरूनगरला सर्वाधिक २९ रुग्ण, कडाचीवाडी मधील एकाचा मृत्यू
तालुक्यात आज ११५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
एकूण रुग्णांची संख्या ३४६१,
२६५१ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ४९, तर ग्रामीण भागात ६६ रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज तब्बल नव्याने ११५ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून आज कडाचीवाडीतील ५१ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात २६५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ४९, तर ग्रामीण भागात ६६ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगरला सर्वाधिक २९ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३४६१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————