चिंतामणी प्रतिष्ठान चाकण आयोजित गणेशोत्सव 2021 विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा…
चिंतामणी प्रतिष्ठान चाकण आयोजित गणेशोत्सव 2021 विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा…
महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
चाकण : येथील चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चिंतामणी प्रतिष्ठाणने गणेशोत्सव साजरा केला. ध्वनी प्रदूषण न करता डीजेला फाटा देऊन यंदा प्रतिष्ठानने काही सामाजिक उपक्रम घेतले. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम घेत यावर्षीचा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. स्पर्धेतील सर्व लहान मुलांना शालेय उपयोगी साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हा गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी ठेवून पार पाडण्यासाठी चिंतामणी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सर्वश्री आकाश जाधव, अश्विन पिंगळे, भावेश गवांदे, प्रशांत पाटील, बसवराज पाटील, विशाल गोरे, मोहन कोकाटे, शुभम मोरे, रोहित जाधव, श्रीकांत गोरे, गणेश भंडारी, समाधान वाघ, ऋषिकेश गोरे, मंगेश घोंगे, संजय पाटील, योगेश ठाकरे, गणेश आरोटे, प्रीतम रामाने, स्वप्नील सोनवणे, योगेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.
००००