Saturday, August 30, 2025
Latest:
निधन वार्तापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविशेषसातारा

साताऱ्याच्या छत्रपती राजघराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
सातारा : येथील छत्रपती राजघराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी ( दि. १३ सप्टेंबर ) दुपारी निधन झाले.

साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी, तर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या त्या काकी होत. सातारा शहरात ‘वहिनीसाहेब’ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. काही महिन्यांपूर्वी त्या अदालत वाड्यातील आपल्या निवासस्थानी घसरून पडल्या होत्या. त्यांना अर्धांगवायूचाही त्रास झाला होता. पुणे येथील रुग्णालयात अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पती शिवाजीराजे भोसले, मुलगी वृषालीराजे पवार, नाशिक, नातू कौस्तुभराजे पवार आणि जावई असा परिवार आहे. सातारा शहरातील अनेक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. असंख्य व्यक्तींना त्यांनी पाठबळ दिले. त्यांच्या जाण्यामुळे शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!