Thursday, April 17, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाप्रशासकीयप्रादेशिकविशेषशिरूर

चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार दिलीपराव मोहिते पाटील, अशोक पवार व राजेश टोपे यांची लक्षवेधी सूचना

चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आमदार दिलीपराव मोहिते पाटील, अशोक पवार राजेश टोपे यांची लक्षवेधी सूचना

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे

मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिरुर खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या उर्वरित कामासाठीचा जवळपास 1356 कोटीं रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला येत्या दोन महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य अशोक पवार, दिलीप मोहितेपाटील, राजेश टोपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

चासकमान प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेऊन लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यातयेईल. तसेच अतिक्रमणाबाबतही काही तक्रारी आहेत, त्याची चौकशी करण्यात येईल. जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या कामाचेही सर्वेक्षणाचे काम सुरु असून, त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!