चांडोली कोविड सेंटरला रोटरी क्लब कडून २५ बेडचे हस्तांतरण
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या पंचम प्रकल्पाच्या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगरच्या मार्फत खेड तालुक्यातील चांडोली कोविड सेंटरमध्ये २५ कोविड बेड हस्तांतरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी चे रो. नितिन ढमाले, अध्यक्ष रो. मेहुल परमार, रो. पवनजी, राजगुरूनगर क्लबचे अध्यक्ष रो. राहुल वाळुंज, सचिव रो. चक्रधर खळदकर, AG रो. अविनाश कहाणे, रो. अविनाश कोहिणकर, IPP रो. नरेश हेडा, IPS रो. सुधीर येवले, रो. गणेश घुमटकर, AG डिस्ट्रिक्ट ३१३१ चे फाउंडेशन डायरेक्टर रो. मंगेश हांडे, PP रो. पवन कासवा, PP रो. माऊली करंडे, रो. दत्ता रुके, रो. संजय कडलग, रो. जितेंद्र गुजराथी, रो. जयंत घोरपडे, चांडोली कोविड सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. माधव कनकवले, डॉ. तायडे, श्री वाडेकर व सर्व स्टाफ उपस्थित होते.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, नितीन मेहुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अक्षय मोटर्सचे रो. अनिल थोरात यांच्या कडून ५० पी पी ई किट देण्यात आले. रो. दत्ता रुके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अध्यक्ष राहुल वाळुंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.