चाकण वाहतूक विभाग हद्दीमध्ये अवजड वाहनास या वेळेत प्रवेश बंदी..
चाकण वाहतूक विभाग हद्दीमध्ये अवजड वाहनास या वेळेत प्रवेश बंदी..
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : चाकण वाहतूक विभाग हद्दीमध्ये अवजड वाहनास प्रवेश बंदी करण्यात येत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखा पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढली आहे.
तसेच सदर ठिकाणी वाहतुक निर्बंधाचे फलक बसविणेची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चाकण वाहतुक विभाग हद्दीमध्ये औदयोगिक वसाहतीमधुन कंपनीचे अवजड वाहने दररोज रस्त्यावर वाहतुकीसाठी येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकण वाहतुक विभागात अवजड वाहनांना नो एंट्री नसल्यामुळे दिवस रात्र अवजड वाहतुक होत असते.
ज्या अर्थी पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सी आर ३७/टी आर ए २, दिनांक २७/०९/१९९६ | नोटीफिकेशन नुसार, मोटार वाहन कायदा कलम ११५ ११६(१) (ए) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखा पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढण्यात आली आहे. यापूर्वी काही निर्बंध असतील ते कायम राहतील व सदरचे निर्बंध तात्पुरत्या स्वरूपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
● चाकण वाहतूक विभाग अंतर्गत चाकण वाहतूक विभाग हद्दीमध्ये जड वाहनास प्रवेश बंदी :- चाकण वाहतुक विभाग हद्दीमध्ये दिवाळी सणानिमीत्त येणाऱ्या जाणाऱ्या सर्व जड वाहनांना दि.०१/११/२०२१ ते दि.१०/११/२०२१ पर्यंत सकाळी ०७ ते १० व सायंकाळी ०४ ते ०९ वाजे पर्यंत नो-एंट्री करणेबाबत अधिसूचना ( नोटीफिकेशन ) काढण्यात आली आहे.
सदर अधिसूचनेच्या प्रति १) मा. पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड शहर, २) पोलीस निरीक्षक, प्रेसरूम, पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड शहर, ३) प्रभारी अधिकारी चाकण वाहतुक विभाग, ४) चाकण नगरपरिषद चाकण, खेड, पुणे यांना देण्यात आल्या आहेत.
००००