चाकण शहर मनसेच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान
स्वातंत्र्यदिनानिमित्त मनसेच्या वतीने नगरपरिषद, वैद्यकीय, पोलीस व कोविड सेंटर कर्मचाऱ्यांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खऱ्या अर्थाने कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्या शासकीय आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी व म्हाळुंगे कोविड सेंटर मधील कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकण शहराध्यक्ष ऋषिकेश वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, मनसे तालुकाध्यक्ष संदीप पवार, चाकण शहर उपाध्यक्ष रोहित जाधव, प्रणव डंबीर, उपनगराध्यक्ष ऋषिकेश झगडे, नगरसेवक प्रकाश भुजबळ, नगरसेवक विकास नायकवाडी, अशपाकभाई शेख, विशाल गंभीर, साहिल शहा, शिवा ताले, साद काझी, हर्षद हुलावळे, विक्रम भालेराव, चिन्मय वाव्हळ उपस्थित होते.
——