चाकण एमआयडीसी रस्त्यावर मालवाहू टेम्पो उलटला, वाहन चालक आढळला दारूच्या नशेत, वाहन चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : आळंदीफाटा ते फोक्सवॅगन या एमआयडीसी रस्त्यावर कुरुळी गावच्या हद्दीत पॅकेजिंग मटेरियल घेऊन जाणारा मालवाहू टेम्पो रस्त्यावर उलटल्याने एक बाजूचा रस्ता काही वेळ बंद ठेवण्यात आला. एमआयडीसी चौकातील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन क्रेनच्या साहाय्याने टेम्पो काढून वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील जंबुकर वस्तीवरील एका कंपनीतून थर्माकोल गोळीचे पॅकेजिंग मटेरियल हडपसर येथे घेऊन जाणारा मालवाहू टेम्पो क्रमांक ( एम एच 14 सी पी 6327 ) आज दि. 8 नोव्हेंबर दुपारी बाराच्या सुमारास रस्त्यावर आडवा उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर टेम्पोचा वाहनचालक दारूच्या नशेत आढळल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वाहन चालकाच्या मदतीने कासारवाडी येथील टेम्पोचा मालकाला संपर्क केला असून वाहन चालकास ताब्यात घेतले आहे.
—
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3494372250670616&id=100002936263421