Wednesday, April 16, 2025
Latest:
खेडगुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रमीडियाविशेष

चाकणमध्ये नगरसेवकाकडे १५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार व मानवाधिकार संघटनेच्या महिला अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल, पत्रकारासह चार जणांना अटक

चाकणमध्ये नगरसेवकाकडे १५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार व मानवाधिकार संघटनेच्या महिला अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल, पत्रकारासह चार जणांना अटक

महाबुलेटीन न्यूज
चाकण : महिलेला विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस ठाण्यात पाठवून प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाखांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाकण ( ता. खेड, जि. पुणे ) मध्ये उघडकीस आली आहे. एका नगरसेवकाने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार आणि तथाकथित मानवाधिकार संघटनेच्या काही महिला अशा एकूण ९ जणांवर सोमवारी ( दि.१३ ) चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार झाले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील घटना ४ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधी दरम्यान आंबेठाण चौक येथील वैशाली कॉम्प्लेक्समध्ये घडली असल्याचे पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी यांनी त्यांच्या जवळील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या चित्रफीत व व्हाट्स अप चॅटिंग पोलिसांकडे दिले आहेत.

या घटनेने चाकण शहरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, उपनिरीक्षक विजय जगदाळे अधिक तपास करीत आहेत.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!