Saturday, August 30, 2025
Latest:
अपघातइंदापूर

बसअपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
इंदापूर : बसच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. आज (दि.१०ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील इंगोले मैदानावर ही घटना घडली.
जावेद नाजउद्दीन बागवान ( वय ४०वर्षे, रा.टेंभुर्णी नाका, इंदापूर ) असे मरण पावलेल्या व्यक्तिचे नाव आहे. त्याचे नातेवाईक अस्लम याकुब चौधरी ( रा.श्रीराम चौक, अकलूज नाका, इंदापूर ) यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
      जावेद बागवान हे भाजीपाला आणण्यासाठी आपल्या  मोटारसायकल ( क्र. एम एच १२ बी के ०११८ ) वरुन टेंभुर्णी वेस नाक्याजवळच्या इंगोले मैदानावरील भाजी मंडईत आले होते. त्यावेळी जुन्या शहा रस्त्यांवरुन आलेल्या  बसने ( क्रमांक माहीत नाही ) मोटारसायकलला समोरुन धडक दिली. बागवान मोटार सायकलवरुन खाली पडल्यानंतर बसचे पुढचे उजवे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले.
जमलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. तपासणीनंतर ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले,असे दिलेल्या खबरीमध्ये अस्लम चौधरी यांनी म्हटले आहे. पोलीस नाईक दीपक पालके अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!