भिगवण स्टेशन येथे कोरोनाचा शिरकाव
भिगवणमध्ये ४ , तर अकोलेत १ कोरोना पॉझिटीव्ह …..
महाबुलेटीन नेटवर्क / विनोद गोलांडे
बारामती : मागील अडीच महिन्यापासून रोखून धरलेल्या कोरोनाने अखेर भिगवण स्टेशन येथे शिरकाव केला आहे. सोमवार ( १३ जुलै ) एकाच दिवशी भिगवण स्टेशन येथे कोरोना रूग्णांच्या संपर्कातील ३ महिला व १ पुरूष असे ४ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे भिगवण स्टेशन येथील आत्तापर्यंत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू तर चार पॉझिटीव्ह असे चित्र दिसून आले.
भिगवण स्टेशन येथे २८ एप्रिलला एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली होती. त्यानंतर १० जुलैला आणखी एक महिला पॉझिटीव्ह आढळून आली. या दोन्ही महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु १० जुलैला पॉझिटीव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कातील १४ व्यक्तींची कोरोना चाचणी केली व इतर १६ जणांना होम काॅरंटाईन केले होते. सोमवार ( दि. १३ जुलै ) सायंकाळी उशीरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी ३ महिला व एक पुरूष कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले .
भिगवण स्टेशन येथील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत व भिगवण जवळील अकोले ( ता. इंदापूर ) येथेही एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे. प्रशासनाने भिगवण स्टेशन व परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करून सील केले आहे.