भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी काशिनाथ पिंगळे व उपाध्यक्षपदी विनोद गोलांडे
भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी काशिनाथ पिंगळे व उपाध्यक्षपदी विनोद गोलांडे यांची निवड
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
बारामती : भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुकाध्यक्षपदी काशिनाथ आबा पिंगळे, तर उपाध्यक्षपदी विनोद दिलीप गोलांडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. कैलास पठारे यांनी दिली.
भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. कैलास पठारे, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुरंदर तालुका अध्यक्ष सिकंदर नदाफ, उपाध्यक्ष रमेश लेंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पत्रकार विनोद पवार, विजय गोलांडे, सोमनाथ लोणकर, निखिल नाटकर, बाळासाहेब वाबळे, महमद शेख, अविनाश बनसोडे, संतोष भोसले आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पत्रकार विनोद पवार यांनी मनोगत व्यक्त केले, तर विजय गोलांडे यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकार यांचे आभार मानले.
——-