भैरवनाथ विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हनुमंतराव खराबी पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी यशवंतराव कड यांची बिनविरोध निवड
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील भैरवनाथ विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी हनुमंतराव सुदाम खराबी पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी प्रगतशील शेतकरी यशवंतराव गणाजी कड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी मावळते चेअरमन राजेंद्र पवार, व्हाईस चेअरमन बेबीताई खराबी, संचालक अरुण सोमवंशी, नंदाताई कड, ज्ञानेश्वर कड, नवनाथ कड, अमृता खराबी, दिनकर कड, ज्ञानेश्वर खराबी, विठ्ठल बिरदवडे, माजी चेअरमन कांताराम कड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व संचालक व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.