Saturday, August 30, 2025
Latest:
खेडविशेष

आता सलून, ब्युटी पार्लरमध्ये बसण्याची झंझट संपली, खेडच्या बॉस सोबत चला

 

खेडच्या तरुणांनी बनविले app

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असून, त्यामुळे विविध गोष्टींना फटका बसत आहे. असाच फटका सलून व्यावसायिक आणि ग्राहकांना बसत आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी खेड तालुक्यातील राजगुरूनगर मधील तरुणांनी BOS – Book Online Salon ( बॉस ) हे android application तयार केले आहे, ज्यामुळे आता ग्राहकांना घरबसल्या सलून appointment बुक करता येणार आहेत. तसेच सलून व्यावसायिकांना ह्या app वर स्वतःचे सलून रजिस्टर करून ग्राहकांना सेवा देता येणार आहे. ते ही अगदी मोफत!!! हे application Play Store वर डाउनलोड करिता उपलब्ध करण्यात आले आहे.

कोरोना मुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. आणि अशीच एक महत्वाची नियमित सुविधा सुद्धा यामुळे प्रभावित झाली आहे. ती म्हणजे ब्युटी पार्लर आणि सलून. महिला व पुरुष यांना नियमित लागणारी ही एक सुविधा आहे जी सोशल डिस्टनसिंगच्या नियमामुळे अडचणीत आली आहे. गर्दी, आणि जवळचा संपर्क येत असल्या कारणाने ही सेवा पुरवण्यात व्यावसायिकांना काही अडचणींना सामोरे जावं लागत होतं. सलून मध्ये होणारी गर्दी आणि अजून बऱ्याच गोष्टी त्यात येतात.

तसेच ग्राहकांना सुद्धा सुरक्षित आणि गर्दी विरहित सुविधा हव्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राजगुरूनगर ( ता. खेड ) मधील दोन तरुण तेजस वाळुंज आणि किशोर सांडभोर यांनी हे app विकसित केले आहे.

तेजस वाळुंज

 

 

किशोर सांडभोर हे टेल्को मध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत, तसेच तेजस वाळुंज ह्यांचा IT software चा व्यवसाय असून ते सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. किशोर ह्यांच्या कल्पनेतून ह्या app चा उदय झाला आहे, तसेच तेजस ह्यांनी हे app तयार केले आहे.

 

किशोर सांडभोर

ह्या app मुळे अनावश्यक गर्दी टाळून सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे शक्य होणार आहे.

 

 ह्या app मध्ये खालील प्रमाणे सुविधा देण्यात आलेल्या आहेत :-◼️देशभरातील व्यावसायिकांना ह्या app वर स्वतः चे सलून मोफत रजिस्टर करता येणार आहे.

◼️पुरुष व महिला ह्या दोन्ही वर्गासाठी सलून रजिस्टर करून ह्यावर सेवा पुरवता येणार आहेत तसेच उपभोगता येणार आहेत.

◼️ग्राहकांना app मध्ये रजिस्टर होऊन, location द्वारे कुठूनही आपल्या जवळचे सलून शोधता येईल.

◼️घरबसल्या बुकिंग करून आपल्या नियोजित वेळेत सर्व्हिस चा उपभोग घेऊ शकता. सलून मध्ये जाऊन नंबर येण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

◼️योग्य सलून निवडून त्यात पुरवण्यात येणाऱ्या सुविधा select करून उपलब्ध वेळेत सर्व्हिस बुक करता येईल.

◼️आपली बुकिंग केलेली वेळ जवळ आली की 15 मिनिट आधी नोटिफिकेशन द्वारे ग्राहकांना कळविण्यात येईल.

◼️ ह्या app मध्ये कोणतेही अतिरिक्त चार्जेस लावण्यात आलेले नाहीत.

◼️ व्यावसायिक व ग्राहकांना वेळेचं नियोजन करता येणार आहे.

◼️ व्यावसायिकांना प्रत्येक गोष्टीचे reports app मध्ये पाहता येणार आहेत. त्यामुळे आता रोज वहीत किंवा डायरी मध्ये नोंद करून ठेण्याची आवश्यकता नाही.

 

हे app जास्तीत जास्त व्यावसायिक तसेच ग्राहकांनी download करून एका नव्या संकल्पनेला उदयास आणून देशाला digitalization मध्ये सहकार्य करावं आणि सोशल डिस्टनसिंगचा अवलंब करून आपल्या आवडत्या सेवा सुरक्षितपणे नियमित उपभोगाव्यात, असं आवाहन BOS च्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!